Showing posts with label Maharashtra. Show all posts
Showing posts with label Maharashtra. Show all posts

Wednesday, September 26, 2012

वीस वर्षांपेक्षा कमी सेवा झालेले सरकारी कर्मचारीही 'गॅच्युइटी'ला पात्र

 

सरकारी कर्मचा-यांपैकी ज्यांची २० वर्षांपेक्षा कमी सेवा झाली आहे किंवा ज्यांनी 

२० वर्षे सेवा पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला आहे किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे ,  

असे कर्मचारी सेवाकाळाच्या बक्षीस रकमेला ' ग्रॅच्युइटी 'ला पात्र असल्याचा निकाल मंगळवारी 

हायकोर्टाने दिला. 

या प्रकरणी जीवन काशिनाथ पाटील व नवीनचंद्र ब्रिजरतलाल शहा या दोन निवृत्त न्यायाधीशांनी 

केलेल्या याचिकांवर न्या. ए. एम. खानविलकर व न्या. विजया कापसे ताहिलरमानी यांच्या 

खंडपीठाने सुनावणी झाली असता ' ग्रॅच्युइटी ' कायदा हा किमान पाच वर्षे सेवा झालेल्या 

कर्मचाऱ्यांना लागू असल्याचा मुद्दा कोर्टाने ग्राह्य धरून दोघा अर्जदारांना आठ टक्के व्याजाने त्यांच्या ' ग्रॅच्युइटी ' ची थकीत रक्कम देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. अर्जदारांतर्फे 

अॅड. व्ही. पी. पाटील यांनी बाजू मांडली. या निकालामुळे २० वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या 

अनेक निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना ' ग्रॅच्युइटी ' रकमेचा लाभ होईल. महाराष्ट्र सेवा नियम 

क्रमांक ४६ चा आधार घेऊन अर्जदारांना ' ग्रॅच्युइटी ' लाभाला अपात्र ठरविण्यात आले आहे , 

 त्या नियमात २० वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना ' ग्रॅच्युइटी ' लाभ देऊ नयेत ,  

असे कुठेही नमूद केले नसल्याचेही कोर्टाच्या निदर्शनाला आणण्यात आले. 

कुठेही नमूद केले नसल्याचेही कोर्टाच्या निदर्शनाला आणण्यात आले. त्यामुळे सर्व मुद्यांचा 

विचार करून खंडपीठाने दोन्ही अर्जदार व्याजासह ' ग्रॅच्युइटी ' ची थकीत रक्कम मिळण्यास 

पात्र असल्याचा निकाल दिला.

 

 

Source::::: Maharashtra Tiems, 26-09-2012, p.03. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16551203.cms